ठाणे : जिल्ह्यातील बेकायदा माध्यमिक शाळांविरोधात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यातच मोहिम उघडून अशा शाळांचा शोध घेत त्यांना शाळा बंद करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. या नोटीसांनंतर जिल्ह्यातील २४ पैकी २३ शाळा बंद झाल्या आहेत. तर, एक शाळा मात्र बेकायदा सुरू ठेवण्यात आली होती. यामुळे या शाळेविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये माध्यमिक शाळा बेकायदेशीरपणे चालविण्यात येतात. या शाळांना कोणतीही मान्यता नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची फसवणूक केली जाते. अशा तक्रारी गेल्या काही वर्षात सातत्याने पुढे येत होत्या.

यंदाच्या वर्षी ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एप्रिलमध्ये बेकायदा माध्यमिक शाळांविरोधात मोहिम उघडली. यात जिल्ह्यात सुरु असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करून त्यात बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या माध्यमिक शाळांचा शोध घेण्यात आला. यात जिल्ह्यात एकूण २४ माध्यमिक शाळा बेकायदा पद्धतीने सुरू असल्याचे उघडकीस आले. या शाळांना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने नोटिसा बजावून शाळा बंद करण्यास सांगितले होते. त्यानुसार २३ संस्था चालकांनी शाळा बंद केल्या असून तसे हमी पत्र संस्थाचालकांनी दिले. या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देण्याचे काम शिक्षण विभागाने केले आहे.

case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
Hathras in Uttar Pradesh
Hathras News : धक्कादायक! शाळेची भरभराट व्हावी म्हणून दुसरीच्या मुलाची गळा दाबून हत्या; काळी जादू असल्याचा पोलिसांना संशय
Mumbai University General Assembly Election result today Mumbai
अधिसभा निवडणुकीचा निकाल आज; याचिकाकर्त्यांची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
Kerala Ban On Digital Notes
Kerala Ban On Digital Notes : आता पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार नाही मुलांचा गृहपाठ, डिजिटल स्वरुपातील नोट्सवर बंदी; ‘या’ राज्याने घेतला निर्णय!
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!

हेही वाचा : भिवंडीत कापड गोदामाला भीषण आग

ठाणे जिल्ह्यात बेकायदा सुरू असलेल्या २३ माध्यमिक शाळा बंद केल्याबाबतचे हमीपत्र संबंधित संस्था चालकांनी सादर केले आहे. यात दिवा येथील स्टार इंग्लिश हायस्कूल, भिवंडीतील वज्रेश्वर भागातील डिवाइन ग्रेस हायस्कूल, कोनगावमधील आर एन इंग्लिश स्कूल, भिवंडी गौरीपाडा येथील फरान इंग्लिश मीडियम स्कूल, दिवा येथील आरंभ इंग्लिश स्कूल, न्यु गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल, ग्रीन व्व्हॅली कॉन्व्हेंट स्कूल, एस. एस. इंग्लिश स्कूल, आर एल पी हायस्कूल, आदर्श गुरुकुल स्कूल, आदर्श गुरुकुल स्कूल, आदर्श गुरुकुल स्कूल, एस आर पी इंग्लिश स्कूल, ओमसाई इंग्लिश स्कूल, सिम्बॉयसिस स्कूल, पब्लीक इंग्लिश स्कूल, आर्य गुरुकुल इंग्लिश स्कूल, श्रीराम कृष्णा इंग्लिश स्कूल, भारत इंग्लिश स्कूल, मुंब्रा येथील श्री. विद्याज्योती इंग्लिश स्कूल, केम्ब्रीज इंग्लिश स्कूल, स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल, जे डी इंग्लिश स्कूल, या शाळांचा समावेश आहे. तर, नवी मुंबईतील बेलापूर येथील अल मुनीहाज सेकंडरी हायस्कूल बेकायदा पद्धतीने सुरू आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये बारावे जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली

अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे की पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे.

ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, ठाणे जिल्हा परिषद