ठाणे : वागळे इस्टेट भागात सोमवारी पहाटे तानाजी शिंदे (२८) याची त्यांच्या तीन मित्रांनी लाकडी फळीने डोक्यात प्रहार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शिवीगाळीतून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : डोंबिवलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

वागळे इस्टेट येथील समतानगर जलवाहिनी परिसरात सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या व्यक्तीच्या डोक्यात गंभीर जखम होती. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, हा मृतदेह रामचंद्र नगर भागात राहणाऱ्या तानाजी शिंदे याचा असून त्याच्या मित्रांनी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकांनी एका १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. शिवीगाळीतून झालेल्या वादात तानाजी याची तिघांनी हत्या केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणातील इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane 28 year old man killed by his friends at wagle estate a minor boy detained by police css