ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका सराफाच्या दुकानात दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यामध्ये सुमारे सात किलो दागिने चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठाणे : अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी, तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सराफाचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री या सराफाच्या दुकानाचा लोखंडी शटर तोडून दोन दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला. या दुकानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी चोरी केले. सुमारे सात किलो वजनाचे हे दागिने असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नौपाडा पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane 7 kg jewellery stolen from jewellery shop in thane railway station area css