ठाणे : भिवंडी येथील दलोंडे भागात एका भरधाव वाहनाने पदपथावर झोपलेल्या ६० वर्षीय भिक्षेकऱ्याला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला असून येथील पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की भिक्षेकऱ्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.

दलोंडे भागात सुमारे आठवड्यापूर्वी एक वृद्ध भिक्षेकरू आला होता. तो गावात भिक्षा मागून भागातील पदपथ, रस्त्यालगत झोपत असे. २७ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता गावचे पोलीस पाटील हे पायी जात असताना त्यांना अंबाडी-वाशिंद येथील पाण्याच्या टाकीजवळ एका व्यक्तीचा अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी त्या व्यक्तीला पाहिले असता, त्याच्या कपड्यांवरून तो भिक्षेकरी असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या डोक्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. पोलीस पाटील यांनी तात्काळ या बाबतची माहिती गणेशपुरी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस पाटील यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने भिक्षेकरूचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader