ठाणे : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे महाराष्ट्रात येऊन बटेंगे.. काटेंगेचा नारा देत आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतोय की हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे, असे विधान आप चे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी शनिवारी रात्री मुंब्र्यातील प्रचारसभेत बोलताना केले.

कळवा-मुंब्रा मतदार संघातील राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंह यांनी मुंब्रा येथील अलमास काॅलनी आणि तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी खोटं बोलण्यात मास्टरकी मिळविली आहे. मोदी म्हणतात की से लोक बेटी पळवतील. लोक सुरक्षित नाहीत. माझे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचे अपयश असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले.

Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”

हेही वाचा : Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप

भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचे राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचे राजकारण आता मुंब्र्यात आणले जात आहे आणि त्या राजकारणाला गाडायचे असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे, असेही ते म्हणाले.

मी जेव्हा मोदींच्या हुकूमशाहीविरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आले. त्यावेळी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते आणि दुसरे कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरविणाऱ्या भाजपविरोधात लढतो, त्याच्या सोबत उभे राहण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत. म्हणूनच मी इथे आलो आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधी मंत्री करीत आहेत. पण, जेपीसीसमोर हा विषय चर्चेला आता आला आहे. ८०० पानांच्या अहवालापैकी फक्त १०० पाने वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधानविरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करीत आहेत. आजची स्थिती अशी आहे की, “वतन की हालत सुनायेंगे तो पत्थर भी रोऐंगे”. तसेच हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. माझे म्हणणे आहे की त्यांनी कधी तरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावे, असे आव्हानही सिंह यांनी दिले.

हेही वाचा : “चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. ती गाडण्यासाठी आपणाला लढावे लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचे राजकारण हे सरकार उघड्या डोळ्याने पहात आहे. द्वेषाचे राजकारण करून आपण विजयी होऊ असे त्यांना वाटत असले तरी आपण ते होऊ द्यायचे नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.