ठाणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी दुपारी टेंभीनाका येथील देवीचे दर्शन घेतले. या दर्शनादरम्यान तेथील पंखे, वातानुकूलीत यंत्रणा आणि ध्वनीक्षेपक बंद करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जय माँ अंबे धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून नवरात्रौत्सवाचे आयोजन सुरू केले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला. यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येथील देवीची आरती करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या समवेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह ठाण्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : कल्याणमध्ये इमारतीच्या पाचव्या माळ्यावरील घराला आग; जीवित हानी नाही

देवीचे दर्शन घेत असताना अचानक पंखे, वातानुकूलीत यंत्रणा आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करण्यात आली होती, असा आरोप ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला. तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोपात तथ्य नसून सर्व यंत्रणा सुरू होती. गर्दीमुळे उकाडा वाढला होता. त्यामुळे यंत्रणा सुरू असूनही उकडत असते असे त्यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane ac fans off during rashmi thackeray visits tembhi naka devi temple css