ठाणे : सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिमंत दाखवित नाहीत. हिमंत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे असे आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मला पद नकोय, मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतो आहे, असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरे हे रविवारी सायंकाळी शाखा भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ठाण्यात येतो तेव्हा जुन्या आठवणी येतात. ठाणेकरांनी खूप प्रेम दिलंय, गद्दार गेले पण ठाणे शिवसेनेचे राहिले आहे. सध्या खोटे बोला पण रडून बोला अशी नवी फॅशन झाली. रडायचे आणि जे पाहिजे ते मिळवायचे असे अनेकवेळा मी पाहिले आहे. काल देखील ते रडले. तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलात. पण माणूस म्हणून पण अपयशी ठरलात असा थेट आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. भाजप आत टाकेल म्हणून २० मे २०२२ ला तुम्ही रडले होते असेही ते म्हणाले. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व दिले. त्या व्यक्तीचे वडिल, पक्ष चोरण्याचा प्रयत्न तुम्ही केला. तुमच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
nagpur district thackeray shiv sena chief devendra godbole resigned from his post
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

हेही वाचा : मुनव्वर फारुखीची एक झलक पाहण्यासाठी मुंब्र्यात लोकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकांचे मोबाईलही चोरीला

तुम्हाला जेवढा मोकळा हात दिला. तेवढा कोणाला दिला नव्हता. पण तुम्ही विश्वासघात केला. महाराष्ट्रात नवा उद्योग अडीच वर्षात आलेला नाही. रोजगार, नोकऱ्या उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठविले आहे. मंत्रालय देखील गुजरातला हलवतील. जाहिरांतीवर खर्च होतो. येथे विकास स्वत:चा, कंत्राटदार यांचा होतो. पण सामान्य नागरिकांचा विकास होत नाही. दुकानदारांकडून वसूली केली जाते. यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. पण शेतात दोन हेलिकाॅप्टर उतरतात. हे शेतीपण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात. जो व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी खंजीर खूपसू शकतो. उद्धव ठाकरे यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यावेळी ४० गद्दारांना घेऊन दिल्लीसमोर लोटांगण घातले. तर तुमचे आमचे काय होणार, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.