ठाणे : मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार आणि त्यांच्या घरावर बुल्डोजर चढविण्यास फक्त भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार नाही तर, काँग्रेसचे अपयश आणि निष्काळजीपणा देखील जबाबदार आहे. त्यावेळी गुन्हेगारांना कारागृहात टाकले असते तर मुस्लिमांवर अशी वेळ आली नसती असा आरोप एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआयएचे नेते अकबरुद्दीन ओवेसी शनिवारी भिवंडी येथे आले होते. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली. मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. त्यांच्या घरावर बुल्डोजर चढविले जात आहेत. यास फक्त भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवार जबाबदार नसून काँग्रेसचे अपयश आणि निष्काळजीपणा जबाबदार आहे. जर काँग्रेसने त्यावेळी योग्य निर्णय घेऊन गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा कारागृहात टाकून दिली असती तर आमच्यावर असे दिवस पाहण्याची वेळ आली नसती असा आरोप ओवेसी यांनी केला.

हेही वाचा : Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असे म्हणणाऱ्यांनी आता हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या अजित पवार यांना अर्थमंत्री बनवून बाजूला बसविले. चांगले दिवस येणार असे म्हणत होते. परंतु चांगले दिवस आले का? असा प्रश्नही त्यांनी केला.

हेही वाचा : “चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

ट्रेनमध्ये प्रवास करत असताना लांब दाढी आहे म्हणून गोळ्या झाडल्या जात आहेत. हातामध्ये पिशवी असेल तर बीफ असेल म्हणून मारले जात आहे. बीफ बंदी, हिजाब बंदी, लव्ह जिहाद असे सांगून तुम्ही द्वेष परवित आहात. परंतु आम्ही प्रेम पसरविण्यासाठी आल्याचेही ओवेसी म्हणाले. हिंदुस्थानात बीफच्या नावाने अनेकांना मारले गेले. परंतु याच बीफ निर्यातदारांकडून मोदी आणि योगी यांनी निवडणूक रोखेच्या माध्यमातून देणगी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane aimim leader akbaruddin owaisi criticizes congress for the situation of muslims css