ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे. दिघे साहेबांच्या हिंदुत्त्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन चित्रपटाच्या टीमकडून अपमान आहे. स्वत:ला मोठे दाखविण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवित आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रसारित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखविणे शक्य नव्हते. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या ९ ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे. शनिवारी या चित्रपटाचे ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आले. या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखविण्यात आला आहे. या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदे सांगत होते की, तुझ्या आणि हिंदुत्त्वामध्ये येथून पुढे मी जरी आलो, तरी मला बाजूला सारून हिंदुत्त्वाला मीठी मार. याच संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा : ठाण्यात रखडलेली इमारत पुनर्विकासाची कामे सुरू होणार

काय म्हणाले केदार दिघे

हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन च्या टीम कडून अपमान आहे! तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार…. असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर दोन चित्रपटात टाकण्यात आला आहे. मुळात दिघे साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते, मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील? आणि ते शिंदेंना का सांगतील?

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane anand dighe s nephew kedar dighe aggressive over dharmaveer 2 trailer hidutva statement css