ठाणे : येथील मोघरपाडा येथे मेट्रो कारशेड उभारण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या मौजे मोघरपाडा येथील १७४ हेक्टर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर यातील बाधित आणि जमीन धारक शेतकऱ्यांना २२.५ टक्के मोबदला तर शासकिय जागांवर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना देखील १२.५ टक्के मोबदला देण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शेतकऱ्यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी, कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होणार नसल्याचेही मंत्री सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मौजे मोघरपाडा येथील सर्व्हे क्रमांक ३० येथील मेट्रो कार शेड उभारण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून शेती करण्यात येत आहे. यातील १६७ भाडेपट्टेधारक शेतकरी व ३१ अतिक्रमणधारक शेतकरी यांना विशेष नुकसान भरपाई योजना म्हणून शासनाने धोरण तयार केले आहे. तर कारशेड उभारणीसाठी लागणारी १७४.०१ हेक्टर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जमिनीवरील पट्टेधारक शेतकरी तसेच अतिक्रमण धारकांची पात्रता जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केली आहे. या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही परंतु कब्जा आहे यांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे, त्यांना २२.५ टक्के मोबदला शासनाच्या नियमानुसार देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही परंतु अतिक्रमण कब्जा आहे व ती जमीन शासनाची आहे, त्या ठिकाणी १२.५ टक्के शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना योग्य तो मोबदला निश्चित देण्यात येणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच या अंतर्गत शेतकऱ्यांना वस्तूनिहाय प्लॉट, तेथील रस्ते, गटारे, भूखंड, इलेक्ट्रॉनिक पोल, शेतकऱ्यांस कसा फायदा होईल व पुनर्वसन कसे होईल, याविषयी देखील त्यांनी सांगितले.