शहापुर : बदलापुरात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शहापुरातही व्यक्तीने आणि त्याच्या प्रेयसीने एका १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच त्या मुलाच्या आईवर देखील लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा : ठाणे : इस्कॉन मंदिरातील सोहळ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता

शहापुर येथे पिडीत महिला त्यांच्या १३ वर्षीय मुलासोबत आणि पतीसोबत वास्तव्यास आहे. तिच्या पतीचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे महिला आणि तिच्या पतीमध्ये वारंवार वादाचे प्रसंग उद्भवत असत. दरम्यान, तिच्या पती आणि प्रेयसीने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्यांच्या १३ वर्षीय मुलावर देखील अनैसर्गिक अत्याचार केला. पिडीत महिलेने याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, शहापुर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.