ठाणे : समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शनिवारी आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सादर केला होता. अवघ्या काही तासांत त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. पक्षात काही दलाल असून त्यांना ओळखून त्यांची हाकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी अबू आसिम आझमी यांच्याकडे केली. पक्ष विस्तारासंदर्भात मांडलेल्या मुद्यावर पक्षाकडून कार्यवाही होत नसल्याचे सांगत रईस शेख यांनी शनिवारी आमदारकीचा राजीनामा दिला होता. रईस शेख यांच्या राजीनाम्यानंतर भिवंडीत रईस शेख यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. तसेच शेख यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यास सुरूवात केली होती. रात्री उशीरा रईस शेख यांनी भिवंडीत आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “दाढी वाढवली म्हणजे, कोणी दिघे साहेब होत नाही”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची टीका

भिवंडी ही समाजवादी पक्षाची आहे. मी कधीही पक्ष सोडणार नाही. परंतु पक्षातील दलालांची हाकलपट्टी करावी अशी मागणी आझमी यांच्याकडे केली. पक्षाला दलालांच्या ताब्यात द्यायचे नाही. ही निवडणूक पैशांच्या जोरावर होणार नाही. हे वक्तव्य दलालांना खटकले होते. कारण, भिवंडीत पैशांचे समीकरण झाले नाही तर यांची घरे कशी चालणार? त्यामुळे दलालांच्या पोटात दुखायला लागले. अशा दलालांना अबू आझमी ओळखतात. आझमी हे त्यांना लाथ मारून बाहेर काढतील असेही शेख म्हणाले. मी कार्यकर्ते आणि जनतेच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे मी राजीनामा मागे घेत आहे. भिवंडीला दलालांपासून मुक्त केले जाईल असा दावाही त्यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane bhiwandi samajwadi party mla rais shaikh withdrawn his resignation css
Show comments