ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. या प्रकरणाची सुनावणी उल्हासनगर येथील न्यायालयात होणार आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात थेट सुनावणी होण्याऐवजी व्हीसी म्हणजेच, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी होणार होती. परंतु आता त्यांना उल्हासनरमधील कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात झाला आहे.
हेही वाचा : VIDEO : आमदारांच्या गोळीबाराचा थरार सीसीटिव्हीमधून उघड
जमिनीच्या वादातून पोलीस ठाण्यातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना कळवा ठाण्यात ठेवण्यात आले आहे. न्यायालय परिसरात गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणपत गायकवाड यांना न्यायालयात थेट हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी पार पडणार होती. त्यानुसार त्यांना ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परंतु त्यांना आता उल्हासनगर येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.