ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षणासाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने झाली आहेत. मराठा आरक्षणाचे प्रतिबिंब आता दिवाळीतही उमटताना दिसत आहे. ठाण्यातील माजिवडा चौकात एक भव्य कंदिल बसविण्यात आले आहे. या कंदिलावर ‘एक मराठा, लाख मराठा’ असा आशय लिहीला आहे. तसेच या कंदिलावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र आहे. हा कंदिल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हेही वाचा : ‘सागर इन्व्हेस्टमेंट’च्या गुंतवणुकदारांचे ठिय्या आंदोलन; उपविभागीय अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या काही नेत्यांनी मंत्री, खासदार आणि आमदार यांची वाहने अडविण्याचा प्रयत्न केला होता. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलने बंद झाली असली तरीही आरक्षणाच्या मागणीची धग कायम आहे. ठाण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने माजिवडा चौकात आठ फुट उंच आकाराचे कंदिल बसविले आहे. या कंदिलावर ‘एक मराठा, लाख मराठा’ असा आशय लिहीला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महारांचे छायाचित्र या कंदिलावर आहे.