ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) शुक्रवारी काटई नाका येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामामुळे ठाणे महपालिका क्षेत्रात शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा… ठाण्यात डिजिटल प्रचाराची नांदी!

हेही वाचा… ठाणे, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची चार कोटीची फसवणूक

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट येथील रुपादेवी पाडा, किसननगर, नेहरूनगर आणि घोडबंदर येथील कोलशेत भागात एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा केला जातो. काटई नाका येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या भागात होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत बंद राहणार आहे. तसेच दुरूस्तीनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

Story img Loader