ठाणे : ठाणे जिल्ह्यातील काही विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीत झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आपलं ठरलयं’ असे सांगत महायुतीचे उमेदवार निवडुन आणण्याचे आवाहन बुधवारी महायुतीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना केले. कोणीही काही म्हणत असले तरी आपण महायुतीच्या उमेदवाराचेच काम करा आणि निवडून आल्यावर कार्यकर्त्यांना जपा, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

ठाणे येथील टिपटाॅप प्लाझा महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मला काही लोक येऊन विचारतात की, आपला कोणाला पाठिंबा आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, कोणीही संभ्रमावस्थेत राहू नका. आपल्या उमेदवारांची निशाणी कमळ, धनुष्य आणि घड्याळ आहे. चौथी आपली कोणतीही निशाणी नाही. यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडुण आणाण्याचे काम करा, असा कानमंत्र मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. ‘आपलं ठरलयं, महायुतीचे वारे फिरलयं आणि महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असेही ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचून त्यांना आपल्या कामाबद्दल माहिती द्यावी. तसेच नागरिकांना सांगा की, मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही आमच्यासाठी दहा मिनिटे देऊन मतदान करा आणि पाच वर्षे सेवा मिळवा, असा विश्वास माझ्यावतीने नागरिकांना द्या, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्याना दिला. खासदार आणि आमदार हे प्रत्येक घरापर्यंत पोहचू शकत नाहीत. महायुतीचा कार्यकर्ताच उमेदवाराचेे ब्रँडींग करतो आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन आपल्या पक्षाला मतदान करायला लावतो. त्यामुळे निवडुण आल्यावर आमदारांनी कार्यकर्त्यांना जपले पाहिजे. त्याच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडवावेत आणि त्यांच्या पाठिशी उभे रहावे, असे आदेशच त्यांनी उमेदवारांना दिले. कार्यकर्त्याकडे लक्ष दिले नाहीतर तोही आपल्याला लक्ष देणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, असेही ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यात यापुर्वी प्रचाराला अधिक वेळ देत होतो. परंतु आता राज्यात सभा घ्यायच्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अधिक वेळ देता येणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी महायुतीचा बालेकिल्ला साबूत ठेवण्यासाठी काम करावे, असेही ते म्हणाले.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Nilesh Rane :
Nilesh Rane : ‘माझ्या मागून आलेले आमदार अन् मंत्री झाले, मी अजून…’, निलेश राणेंच्या विधानाची चर्चा
Shinde group MLA Pratap Sarnaiks advice to Ajit Pawar groups Najeeb Mulla
नजीब मुल्ला तुम्ही देखील ‘जय श्री राम’ बोला
What Ajit Pawar Said About MVA and Balasaheb Thackeray?
Ajit Pawar : अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत, “बाळासाहेब ठाकरे हयात असते तर महाविकास आघाडी..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : भाजपचे कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील यांची हकालपट्टी

बाळसाहेबांचीच मालमत्ता

शिवसेना आणि धनुष्यबाण ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच मालमत्ता आहे, असे स्पष्ट करत बाळासाहेबांनी कमावलेली शिवसेना आणि धनुष्यबाण ही मालमत्ता गहाण टाकण्यात आली होती. ती वाचविण्याचे काम मी केले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. धनुष्यबाण गोठवून टाका असे ठाकरे गट सांगत होता. बाळासाहेबांची निशाणी धनुष्यबाण घोटून टाका सांगताना त्यांना काहीच वाटले नाही. त्या धनुष्यबाणाचे त्यांना काहीच पवित्र नाही, अशी टिका करत धनुष्यबाणाचा मान सन्मान राहवा आणि शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ नये यासाठीच मी धाडस दाखवून अडीच वर्षाचा झालेला वनवास दूर केला, असेही ते म्हणाले. मशाल ही क्रांतीची नाही तर, आग लावून घरे पेटवणारी आहे, अशी टिका त्यांनी केली.

देशामध्ये लाडक्या बहिणींना स्वातंत्र्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे काम सरकारने केले असून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याने त्यांचा घरात मान-सन्मान वाढला आहे. गावागावांमध्ये लाडकी बहिण सुखी आहे. उद्धव ठाकरे, मलिकार्जुन खर्गे आणि नाना पटोले हे म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर महायुतीने सुरू केलेल्या १० ते ११ योजनेची चौकशी लावणार. जे दोषी अधिकाऱ्यांना आणि योजना लागू करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार. आम्हाला काय पोकळ धमक्या देता. मी संघर्षातून जेल भोगत इथपर्यंत पोहचलो. लाडक्या बहिणीसाठी एकदा नाही दहा वेळा जेलमध्ये जावे लागले तर चालेल. परंतु त्या मला जेलमध्ये जाऊ देणार नाहीत. कारण, लाडक्या बहिणी त्यांचे सरकार येऊच देणार नाही, असे शिंदे म्हणाले. बदलापूरचा किस्सा सगळ्यांना माहित आहे. सरळ फाशीची शिक्षा. चुकीला माफी नाही. मुख्यमंत्री असल्यामुळे काही निर्बंध येतात. परंतु अन्याय, अत्याचार केला तर त्याचा कार्यक्रम करून टाकू, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : नजीब मुल्ला तुम्ही देखील ‘जय श्री राम’ बोला

मुख्यमंत्री शिंदे निवडणुक लढणार नव्हते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील मतदार संघामधील महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी येण्यास सांगत होता. या प्रचार सभांमुळे आपल्याला कोपरी पाचपाखाडीतून लढता येणार नसल्याचे शिंदे यांनी राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांना सांगितले होते. तुम्ही फक्त अर्ज भरा. आम्ही स्वत:ला एकनाथ शिंदे समजू आणि तुमचा प्रचार करु, अशी विनंती मी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांना केली. त्यानंतर शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी मेळाव्यात बोलताना दिली.