ठाणे : उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश यांच्या प्रकृतीची विचारपुस करत याप्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती

हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनामध्ये शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड हे दोघे बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश यांच्यात बोलाचाली झाली. यावरून संतप्त झालेल्या आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळीबार केला. यात महेश आणि त्यांचा सहकाही राहुल पाटील हे दोघे जखमी झाले. या दोघांना ठाण्याच्या ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्युपिटर रुग्णालय प्रशासनाने मेडिकल बुलेटिन काढून दोघांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली असून त्यात महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक तर, राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार

या गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांची झी २४ तास या वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरून दिलेल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शुक्रवारी रात्री (काल) घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच महेश यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane cm eknath shinde meet mahesh gaikwad who injured in ulhasnagar bjp mla s firing css