ठाणे : राम मंदिर बनवणार पण, तारीख सांगणार नाही, असे काही लोक म्हणायचे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मंदिरही उभारले आणि तारीखही सांगितली, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षाला लगावला. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे. संपूर्ण देशात राम मंदिराबाबत उत्सूकता असून संपूर्ण देश राममय झाला असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे शहरातील गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर अशी श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढण्यात आली होती. या यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. भाजप, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. लेझीम, ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या यात्रेत श्री राम घोषणाबाजी सुरू होती. यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. या यात्रेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
BMC financial condition information in marathi
घटलेल्या मुदतठेवी आर्थिक स्थितीचा एकमेव निकष नाही; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे मत
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण

हेही वाचा : कल्याणातील आयमेथॉन स्पर्धेत पाच हजार धावपटूंचा सहभाग, सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी राबवण्यात आला उपक्रम

आयोध्येत राम मंदिर व्हावे अशी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाण्यात आलेल्या कारसेवा यात्रेत दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी चांदीची विट देऊन ती आयोध्याला पाठविली होती. त्यामुळे ठाण्याचे आणि आयोध्याचे एक जुने नाते आहे, असेही ते म्हणाले. राम मंदिर हा विषय अस्मिता, श्रद्धेचा आहेच पण, त्याचबरोबर देशाचा अभिमान आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे. भव्य राम मंदिर तयार झाले आहे. हे मंदिर २२ जानेवारीला रामभक्तांसाठी खुले होणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात उत्साह आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader