ठाणे : धर्मवीर -२ चित्रपटाच्या मुहूर्तासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुन्या आनंद आश्रमाचे नेपथ्य पाहून भारावून गेले. दिघे साहेबांची खुर्ची आणि त्यांच्यासोबत मांडलेले टेबल, कार्यालय बाहेर उभे असलेली दिघे यांची गाडी, हे पाहून भारावलेल्या मुख्यमंत्र्यांना दिघे साहेबांच्या ‘त्या’ हंटर ची आठवण आली. या हंटरचा प्रसाद अनेकांनी चाखलेला. साहेबांचा हंटर कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित निर्मात्यांना केला.

काही वर्षांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका कार्यालयाचे नुतनीकरण केले. कार्यालयातील रचनेत फार बदल न करता कार्यालयाला नवीन झळाळी देण्यात आली आहे. तसेच दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला. टेंभीनाका येथील कार्यालयाचे नुतनीकरण झालेले असल्यामुळे त्याठिकाणी चित्रपटाचे चित्रिकरण करणे शक्य होत नव्हते. यामुळे ठाण्याच्या कोलशेत भागात धर्मवीर चित्रपटासाठी जुने आनंद आश्रम हुबेहुब उभारण्यात आले असून त्याठिकाणी आनंद दिघे यांच्या खोलीपासून ते अगदी तेथील वस्तु जशाच्या तशा ठेवण्यात आल्या आहेत. दगडी भिंतीची कुंपण, लोखंडी जाळीचा गेट, कौलांचे छप्पर, आनंद दिघे यांची खुर्ची आणि टेबल, त्या समोर समस्या घेऊन येणाऱ्यांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या, मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच उभी असलेली दिघे यांची गाडी आणि त्या बाजुला असलेली दुमजली इमारत, असे नेपथ्य चित्रपटासाठी करण्यात आले आहे. ‘धर्मवीर-२’ चित्रपट मुहूर्त कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील शिवसेनेचे अनेक नेते याठिकाणी आले आणि ते आश्रमातील जुन्या आठवणीत रममाण झाले.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे

हेही वाचा : जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत सगळेच रमले

‘आनंद दिघे साहेबांचा हंटर कुठेय’

ठाण्यातील कोलशेत भागातील कल्पतरु गृहसंकुलात धर्मवीर-२ चित्रपटाच्या मुहूर्ताप्रसंगी उभारण्यात आलेले ‘आनंदाश्रमा’तील हे नेपथ्य सोमवारी अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आनंद दिघे यांचे ‘शिष्योत्तम’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अगदी हुबेहुब वाटणाऱ्या या आश्रमाला भेट दिली. तेथील दिघे यांची खोली पाहत असताना त्यांनी ‘दिघे साहेबांचा हंटर कुठेय’, अशी विचारणा निर्मात्यांकडे केली. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या आणि अन्याय करणाऱ्यांना दिघे हे हंटरने मारायचे. या हंटरचा प्रसाद अनेकांनी चाखलेला. धर्मवीर चित्रपटात त्या हंटरने प्रसाद देतानाचे दृश्य दाखविण्यात आले आहे.

आनंद आश्रम श्रद्धास्थान

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे टेंभीनाका परिसरात कार्यालय आहे. आनंद आश्रम या नावाने हे कार्यालय ओळखले जाते. या कार्यालयातूनच ते जिल्ह्यातील शिवसेनेचा कारभार चालवीत होते आणि त्याचबरोबर येथूनच ते समाजकार्य करीत होते. त्यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे तसेच इतर स्थानिक नेत्यांनी आनंद दिघे यांच्यासोबत काम केले, ते याच कार्यालयातून. शिवाय, अनेकांच्या समस्यांचे निराकारणही याच कार्यालयातून झाले. यामुळे नेत्यांसह जिल्ह्यातील शिवसैनिकांचे हे कार्यालय श्रद्धास्थान मानले जाते.

हेही वाचा : संजय राऊत यांच्यामुळेच दिघेंना टाडा लागला- शिंदे गटाचा आरोप

“नवीन आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच जातात. पण, धर्मवीर-२ चित्रपट मुहूर्त कार्यक्रमादरम्यान चित्रपटासाठी उभारण्यात आलेल्या आनंद आश्रमावर गेली आणि ते पाहाताना त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी त्यांनी ‘दिघे साहेबांचा हंटर कुठेय’, अशी विचारणा केली.” – मंगेश देसाई, निर्माता, धर्मवीर चित्रपट