ठाणे : भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त शनिवारी राहुल गांधी हे ठाण्यात आले होते. ठाणे जिल्हा कमिटीने दिलेल्या माहितीनुसार ते कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार होते. परंतु या दोन्ही स्मारका जवळ राहुल गांधी थांबले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्याचे टाळल्याचे चित्र ठाण्यात निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाबद्दल शिवसेना ठाकरे गटातून काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ठाणे : टीएमटी बसगाड्यांमध्ये आता सर्व महिलांना सरसकट सवलत; महिलांकडे ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा न मागण्याचे निर्देश

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. यात्रा निमित्ताने ते यात्रा हे ठाणे शहरात दाखल झाले. या यात्रेच्या मार्गाबाबतची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली होती. त्यानुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोर्ट नाका येथील स्मारक आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला ते पुष्पहार अर्पण करणार होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक वगळता राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यास गेले नाही. या घटनेनंतर खासदार राजन विचारे हे काहीसे नाराज झाले होते. ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नाराज दिसून येत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane congress leader rahul gandhi ignored statue of chhatrapati shivaji maharaj and anand dighe css
Show comments