ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शनिवारी ठाण्यात येणार असून ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील स्मारकाला पुष्पाहार अर्पण करणार आहेत. भिवंडी येथील आनंद दिघे चौकात ते आज, शुक्रवारी सभा घेणार आहेत. त्यामुळे आनंद दिघे यांची भुरळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पडली असल्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या कामाचा आवाका ठाणे, मुंबई, पालघर या भागात मोठा होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतरही सर्वच पक्षातील नेते त्यांचा आजही आदर करतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे आनंद दिघे हे राजकीय गुरु होते. शनिवारी राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने ठाण्यात येणार आहे. मुंब्रा येथील कौसा भागातून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. कळवा येथे आल्यानंतर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर कोर्टनाका येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा : राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ भिवंडीत, सुरक्षेसाठी ‘यावर’ बंदी…

येथील काही मीटर अंतरावरील टेंभीनाका परिसरात आनंद दिघे यांचे मठ आहे. या आनंद मठाजवळच आनंद दिघे यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे. या स्मारकाला राहुल गांधी पुष्पहार अर्पण करतील. तसेच भिवंडीत आज, शुक्रवारी राहुल गांधी यांची चौक सभा होणार आहे. ही चौक सभा देखील भिवंडीतील आनंद दिघे चौकात होणार आहे. त्यामुळे आनंद दिघे यांची भुरळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पडली असल्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.

Story img Loader