ठाणे : घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदानात ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे मनसेचे बुधवारी अनोखे आंदोलन केले. पालिका मुख्यालय इमारतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फुटबॉल खेळून आंदोलन केले. तसेच फुटबॉल वर निषेधाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून हा फुटबॉल अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला.

ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून, काही ठिकाणी विकासकांकडून टीडीआरमार्फत विकास कामे केली जातात. घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीने विकसित होत असून, येथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने ठाणे महापालिकेने बोरिवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. पण, या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही. ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केले असून, तिथे आर एम सी प्लांट तसेच शेड उभारली आहे आणि जलवाहिन्यांची साठवणूक केली आहे. या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना  नाहक सहन करावा लागत आहे.

Citizens suffering from water shortage march to the municipal office Mumbai print news
पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांचा महापालिका कार्यालयावर मोर्चा; नळ जोडण्यांची तपासणी करण्याची अंधेरीवासीयांची मागणी
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ahilyanagar police
अहिल्यानगर : पोलीस बळाचा वापर करत महापालिकेने अतिक्रमणे हटवली
Pimpri Municipal Corporation administration takes action against unauthorized constructions Pune news
पिंपरी: चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर पहाटेपासून कारवाई; तगडा पोलीस बंदोबस्त
Commissioner Shekhar Singh orders closure of RO project in Pimpri pune news
अखेर पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्प बंद; आयुक्तांचा आदेश
Commissioner and Administrator of Ichalkaranji Municipal Corporation Omprakash Divate
इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकांचा पदभार काढून घेतला
Thane Municipal Corporation bans POP Ganesh idols in Thane
ठाण्यात पीओपी गणेश मुर्तींना बंदी, ठाणे महापालिकेचा निर्णय
mla Vijay Shivtare of Shiv Sena Shinde faction has been removed from District Planning Committee
आमदार शिवतरेंना वगळले, महायुतीत वादाची ठिणगी ?

हे ही वाचा… डोंबिवली रेल्वे स्थानकात जाहिरात फलकांमुळे इंडिकेटर दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदाराने गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि मनसेच्या वतीने करण्यात आला होता. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचे आरक्षण असून मैदान डंपिंग ग्राउंड बनले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेने हे अतिक्रमण त्वरीत हटवावे यासाठी मनसेच्या वतीने गेल्या  महिन्याभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. क्रीडा विभागाने यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून मैदान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याचे पालन महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नसल्यामुळे मनसे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापालिकेतील नगर अभियंतांच्या दालना बाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदविला. तसेच हा फुटबॉलवर निषेधाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून सदर फुटबॉल अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला.

हे ही वाचा… कल्याणमध्ये बैलबाजारात प्रतिबंधित औषधांसह दोन जण अटकेत

‘‘घोडबंदर येथील बोरिवडे मैदान येथे केलेले अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात आले नाही तर मनसेच्या वतीने पुढच्या वेळेला आयुक्तांच्या दालना बाहेर निषेध नोंदवण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. –
स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसे जनहित व विधी विभाग

Story img Loader