ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघामध्ये एकूण १८ विधानसभा मतदार संघ येत असून त्यापैकी १४ मतदार संघामध्ये महायुतीचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. तर, ४ मतदार संघांमध्येच केवळ महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे. महायुतीला १४ मतदारसंघांत मताधिक्य मिळाले असले तरी त्यापैकी नवी मुंबईतील ऐरोली आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघात दहा हजारांच्या आत तर बेलापूर मतदार संघात २० हजारांच्या आत महायुतीला मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघामध्ये महायुती काठावर असल्याचे दिसून येत असून विधानसभा निवडणुकीत येथे चुरशीची लढत होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा महायुतीने काबीज केली तर, भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने म्हणजेच महाविकास आघाडीने काबीज केली. यामुळे जिल्ह्यात महायुतीचा वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत एकूण १८ विधानसभा मतदारसंघ येतात. लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघनिहाय किती मतदान झाले, याचे आकडे स्पष्ट झाले असून त्यात १८ पैकी १४ मतदारसंघांत महायुतीचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले. तर, ४ मतदार संघामध्येच केवळ महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे.

One hundred plots owned by Sangli Municipal Corporation will be beautified
सांगली महापालिकेच्या मालकीचे शंभर भूखंड सुशोभित होणार
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Central Civil Services information in marathi
मुलाखतीच्या मुलखात : केंद्रीय सेवा
election commission status to cooperative election authority
सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही
Inquiry , Beed District Planning Committee, Beed ,
बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी, दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Navi Mumbai, Re-survey, constructions ,
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण, सिडको मंडळाकडून सर्वेक्षणासाठी ५५ कोटी रुपये खर्च

हेही वाचा…भाजपच्या हस्तक्षेपावर शिंदे गटाची नाराजी; निकालानंतर पक्ष नेते आक्रमक

ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये ठाणे, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपखाडी, बेलापूर आणि ऐरोली असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्वच ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे आमदार आहेत. यातील ठाणे, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपखाडी या प्रत्येक मतदार संघामध्ये महायुतीचे अर्थात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना ४० हजारांच्या पुढे मताधिक्य आहे. तर, बेलापूरमध्ये १२ हजार ३१२ आणि ऐरोलीमध्ये ९ हजार ७३५ इतके कमी मताधिक्य मिळाले आहे. ठाण्याच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र व माजी खासदार संजीव नाईक हे उमेदवारीसाठी इच्छूक होते. परंतु महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदेच्या शिवसेनेला गेल्याने नाईक आणि त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर नाईक कुटुंबीय प्रचारात उतरले. नाईकांच्या उपस्थितीमुळे काही प्रमाणात का होईना नरेश म्हस्के यांच्याबद्दलची नाराजी दूर करण्यात भाजपला यश मिळाले. त्यामुळे अपेक्षा असूनही राजन विचारे यांना नवी मुंबईतून मताधिक्य घेता आले नाही. म्हस्के यांना मिळालेले २२ हजारांचे मताधिक्य इतर मतदार संघापेक्षा कमी असले तरीही निवडणुकीची पार्श्वभूमी पहाता विचारे यांना येथे आघाडी घेता आली नाही.

कळवा मुंब्रा मविआकडेच

कळवा-मुंब्रा या मतदार संघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे करतात. या मतदार संघातून ते तीनदा विजयी झालेले आहेत. या मतदार संघातील कळवा परिसरात आगरी समाज तर, मुंब्रा परिसरात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात आहे. या मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांना एक लाख ३५ हजार ४९६ मते तर, डॉ. श्रीकांत शिंदे यांना ६९ हजार ९८८ मते मिळाली. याठिकाणी दरेकर यांना ६५ हजार ५०८ इतके मताधिक्य मिळाले. यानिमित्ताने हा मतदार संघ महाविकास आघाडीकडेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हेही वाचा…Kalyan Lok Sabha Election Result 2024: दरेकरांची वाढलेली मते किणीकरांसाठी डोकेदुखी ? अंबरनाथमध्ये ठाकरे गटाला ५८ हजार मते

भिवंडी, शहापूर निर्णायक

भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांना भिवंडी पूर्व आणि पश्चिम या मतदारसंघातून १ लाख २३ हजार २२१ इतके मताधिक्य मिळाले. हे दोन्ही मतदारसंघ मुस्लीमबहुल आहेत. यातील भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी म्हात्रे यांचा प्रचार केला. तर, भिवंडी पश्चिम मतदार संघामध्ये भाजपचे महेश चौगुले हे आमदार आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. तर, शहापूरमध्ये अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांना पहिल्या क्रमांकाची म्हणजे ७४ हजार ६८९ इतकी मते मिळाली आहेत. त्यांना येथे १९ हजारांचे मताधिक्य मिळाले. शहापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत. या ठिकाणी अपक्ष उमेदवार सांबरे यांनी १९ हजारांचे मताधिक्य घेतले.

Story img Loader