ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी भागात एका वीट भट्टीवर अवघ्या पाच हजार रुपयांसाठी दाम्पत्याला आठ वर्ष वीट भट्टीवर राबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यापूर्वीही जिल्ह्यात आदिवासी समाजातील लहान मुलांची ५०० ते एक हजार रुपयांना विक्री करून त्यांना वेठबिगारीसाठी राबविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात वेठबिगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे.

तक्रारदार हे मूळ पालघर जिल्ह्यातील आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी सिद्धीक शेख नावाच्या व्यक्तीने त्यांना पाच हजार रुपयांचा ‘ बयाना ’ दिला होता. या मोबदल्यात सिद्धिक हा तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीला चिखल काढणे, विटा थापणे, विटा रचणे आणि विटा वाहन्यांची कामे करवून घेत होता. या कामाबाबत त्यांना कोणतेही पैसे दिले जात नव्हते. वीट भट्टी बंद झाल्यानंतर सिद्धीक हा त्यांना पावसाळ्यात गवत कापणीचे काम करून घेत असे. त्यांना दुसऱ्या ठिकाणी काम करायचे असल्यास तिथे देखील काम करू दिले जात नव्हते. पैसे फिटेपर्यंत काम करावे लागेल अशी धमकी दिली जात होती. तसेच कामात चूक झाल्यास किंवा काम करण्यास उशीर झाल्यास त्यांना मारझोड केली जात होती.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Agriculture Department prepared for Rabi season in district preparing agriculture in Konkan region for second time after paddy harvest
जिल्ह्यात ५ हजार ६८२ हेक्टरवर रब्बीचे नियोजन, २ हजार ९४० हेक्टरवर कडधान्यांची लागवड
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ

हेही वाचा : ठाणे : घोडबंदर मार्गावर अपघातामुळे कोंडी

तक्रारदार महिलेसह या वीट भट्टीवर १० ते १२ जण वेठबिगारी म्हणून काम करत होते. त्यांनाही असाच त्रास सहन करावा लागत होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी भिवंडीतील चिंबीपाडा येथील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या अलका भोईर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे सिद्धीक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रमजीवी संघटनेने भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांची भेट घेतली. अधिक पाटील यांनी या सर्व वेठबिगारींची मुक्तता करून त्यांना पूनर्वसन प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये ज्येष्ठ नागरिकाची १४ लाखांची फसवणूक

काही महिन्यांपू्र्वी ठाणे आणि पालघर जि्ल्ह्यातील आदिवासी मुलांचाही नगर जिल्ह्यात वेठबिगारी म्हणून वापर होत असल्याचा प्रकार समोर आला होता. भिवंडी तालुक्यातील दोन मुलांची आणि पालघर जिल्ह्यातील दोन मुलींची अवघ्या ५०० ते एक हजार रुपयांमध्ये वेठबिगारी म्हणून खरेदी करण्यात आली होती. या मुलांकडून जनावरे सांभाळणे, शेण काढणे तसेच घरातील विविध कामे मेंढपाळ करुन घेत होते. तसेच त्यांना शिवीगाळही करत. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील मेंढपाळांविरोधात भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात वेठबिगारीचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.

Story img Loader