ठाणे : ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलिस भरतीसाठी २६ आणि २७ जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत १ आणि २ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई संवर्गातील ६६६ तर, चालक पोलिस शिपाई संवर्गातील २० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : जाहीरात फलक मालक आणि अधिकाऱ्यांमध्ये भागीदारी, मनसेच्या आरोपामुळे खळबळ

या भरती प्रकीयेसाठी २६ आणि २७ जुलैला महिला उमेदवारांची मैदानी चाचणी साकेत मैदान येथे घेण्यात येणार होती. परंतु ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेणे शक्य होणार नाही. त्यामुुळे २६ आणि २७ जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत ही चाचणी १ आणि २ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे, अशी माहिती ठाण्याचे अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय जाधव यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district police recruitment postponed due to heavy rain css