ठाणे : ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी ते २६ डिसेंबर या कालावधीत सव्वा दोन लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नोंदणी ठाणे, मिरा भाईंदर आणि भिवंडी शहरात झाली आहे. येथील वाहन नोंदणीची संख्या १ लाख १० हजार ५३१ इतकी आहे. वाहनांमध्ये सर्वाधिक विक्री दुचाकी आणि मोटारींची झाली आहे. तर २०२२ मध्ये याच कालावधीत २ लाख १७ हजार ४५८ वाहनांची विक्री झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी अरुंद रस्ते आणि दुसरीकडे वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुक कोंडीचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागतो. यावर्षी ठाणे जिल्ह्यात २ लाख २६ हजार ६०९ वाहनांच्या विक्रीची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक वाहनांची विक्री ठाणे, मिरा भाईंदर आणि भिवंडी शहरात करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई शहरात वाहनांची नोंद झाली आहे.
हेही वाचा : ठाणे : भरारी पथकांची निष्क्रियता वाळू माफियांच्या पथ्यावर, जिल्ह्यात सर्वत्र दिवस रात्र अवैध वाळू उपसा
ठाणे, मिरा भाईंदर आणि भिवंडी शहरात १ लाख १० हजार ५३१ वाहनांची नोंदणी झाली आहेत. तर डोंबिवली ते बदलापूर येथील ग्रामीण आणि शहरी भागात ७८ हजार ११० वाहनांची नोंद झाली आहे. नवी मुंबईमध्ये ३७ हजार ९६८ वाहनांची नोंद झाली आहे. सर्वाधिक विक्री दुचाकींची झाली आहे. तसेच खासगी मोटार विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. ठाणे, मिरा भाईंदर आणि भिवंडी शहरात ७१ हजार १४१ दुचाकींची विक्री झाली. तर २१ हजार ६६५ नव्या मोटारींची नोंदणी झाली आहे. उर्वरित वाहनांमध्ये खासगी आणि व्यावसायिक वाहनांचा सामावेश आहे. डोंबिवली ते बदलापूर क्षेत्रात ५५ हजार ७२० दुचाकी आणि १४ हजार ६२ मोटारींची नोंदणी झाली. तर नवी मुंबई शहरात १८ हजार ३५ दुचाकी आणि १० हजार ५३० मोटारींची नोंदणी झाली आहे.
हेही वाचा : घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण ठाणे, परिसरासाठी महत्त्वाचे का? भविष्यात कोणते फायदे अपेक्षित?
“करोनानंतर वाहन विक्री वाढत असल्याचे चित्र आहे. वाहन खरेदी वाढल्याने दरवर्षी नव्या वाहनांची नोंदणी देखील वाढत आहे.” – जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.
वाहने विक्री
२०२२
शहर – वाहनांची नोंदणी
ठाणे, मिरा भाईंदर, भिवंडी- १ लाख ५ हजार ४२८
डोंबिवली ते बदलापूर – ७६ हजार ४११
नवी मुंबई- ३५ हजार ६१९
एकूण – २ लाख १७ हजार ४५८
हेही वाचा : ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तिकीट तपासणी
वाहन विक्री
२०२३ (१ जानेवारी ते २६ डिसेंबर)
शहर वाहनांची – नोंदणी
ठाणे, मिरा भाईंदर, भिवंडी- १ लाख १० हजार ५३१
डोंबिवली ते बदलापूर – ७८ हजार ११०
नवी मुंबई- ३७ हजार ९६८
एकूण – २ लाख २६ हजार ६०९