कल्याण : राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी शासनाने महास्वयंम पोर्टल सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या पोर्टलचा सर्व्हर संथगती असल्याने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. याविषयीच्या अनेक तक्रारी ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, भिवंडी परिसरातील तरूणांकडून करण्यात येत आहेत. महास्वयंम पोर्टल संथगतीने चालत आहे. या पोर्टलवर तात्काळ सुशिक्षित बेरोजगारांना नोंदणी करणे शक्य होत नाही, अशा अनेक तक्रारी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी, उद्योजक, नियोक्ते, प्रशिक्षक या गटांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडे केल्या आहेत. उपलब्ध नोकऱ्या, उद्योजकतेमधील संधी यांचे सम आकलन करून त्याप्रमाणे लाभार्थींना माहिती देण्याचे काम, रोजगार संधी, तरूणांमधील कौशल्ये विकसित करून त्यांना नोकरीच्या उपलब्ध करून देणे, हे काम या पोर्टलच्या माध्यमातून केले जाते. केंद्र, राज्य शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण, परिपूर्णते नंतर कर्ज, उद्योजकतेच्या संधी यांची माहिती या पोर्टलवर आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी ठप्प, महास्वयंम पोर्टलचा सर्व्हर संथगती
हे पोर्टल कधी बंद तर कधी संथगती असल्याच्या तक्रारी लाभार्थींनी कौशल्य विभागाकडे केल्या आहेत. या विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे तरूणांनी सांगितले.
Written by भगवान मंडलिक
ठाणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-12-2023 at 13:20 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district registration of educated unemployed in rural areas stopped mahaswayam portal server down css