ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच, ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, अंबरनाथ, उल्हासनगर या मतदार संघातील प्रचारात मात्र पाणी टंचाईच्या मुद्द्याला स्थानच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाण्यातील घोडबंदर, वागळे इस्टेट, पाचपाखाडी या भागात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असली तरी हा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मात्र ठसठशीतपणे मांडताना दिसून आलेला नाही.

ठाणे जिल्ह्यातील शहरांना विविध स्त्रोतांमार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम प्राधिकरण, चिखलोली धरण या स्त्रोतांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील शहरी भागांचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून त्या तुलनेत शहरांमध्ये होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागला आहे. यातूनच विविध भागातून पाणी टंचाईच्या तक्रारी पुढे येत आहेत. पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून नवी मुंबईतील ऐरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, कळवा-मुंब्रा तसेच इतर मतदार संघात राजकारण तापले आहे. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील, बेलापूरमधील राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवार संदीप नाईक आणि मिरा-भाईंदरमधील काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसैन यांनी पाणी टंचाईचा मुद्दा प्रचारात घेत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. या मतदार संघामध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच त्याशेजारी असलेल्या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा मतदार संघातील प्रचारात मात्र पाणी टंचाईच्या मुद्द्याला स्थानच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
tigress Bijli walking with three cubs
Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…

ठाणे महापालिका क्षेत्रात कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर आणि ओवळा माजीवडा हे मतदार संघ येतात. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागातील गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवते. या टंचाईच्या समस्येमुळे नागरिक मेटाकुटीला आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी वाढीव पाणी पुरवठा मिळण्याकरिता पालिकेचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून काही प्रमाणात वाढीव पाण्याला मंजुरी मिळाली. यामुळे ४८५ दशलक्षलीटरमध्ये वाढ होऊन ते ५८५ दशलक्षलीटर इतके झाले. असे असले तरी ते पाणी शहरात पुरेसे पडत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या समस्येचा मुद्दा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या केंद्रस्थानी असले अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र प्रचारातून हा मुद्दाच हरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली पालिका दररोज पालिका हद्दीत ४२९ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करते. सन २०३२ पर्यंत पालिका हद्दीतील लोकसंख्या ३४ लाख ९० हजार होणार आहे. या वस्तीसाठी पालिकेला ६१६ दशलक्ष लीटर पाण्याची गरज लागणार आहे. वाढीव पाणी पुरवठ्यासाठी पालिकेने शासनाकडे दोन वर्षापूर्वी मागणी केली आहे. २७ गाव परिसर, एमआयडीसी औद्योगिक निवासिक क्षेत्र, अटाळी आंबिवली, कल्याण पूर्व येथील चिंचपाडा, डोंबिवलीतील गरीबाचा वाडा नवापाडा या भागात पाणी टंचाई जाणवते. कल्याण ग्रामीणमधील प्रचारात टंचाईचा मुद्दा उपस्थित होत आहे.

हे ही वाचा… महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरे

भिवंडी महापालिका क्षेत्रात दररोज १२० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. तर या शहराला दररोज १६० दशलक्ष लीटर पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे. या शहरातही काही ठिकाणी टंचाईची समस्या जाणवते. बदलापूर शहराला उल्हास नदीच्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. या बंधाऱ्याजवळील जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता १३० दशलक्ष लिटर इतकी आहे. यातील बदलापूर शहराला ७० दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. शहराची लोकसंख्या वेगाने वाढली आहे. अनेक नवे गृहप्रकल्प उभे राहत असून शहराच्या वेशीवर जलकुंभापासून दूर असलेल्या अनेक गृहसंकुलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. बदलापूर शहरातील उल्हास नदीवरून बॅरेज येथील केंद्रातून सुमारे ६० दशलक्ष लिटर पाणी अंबरनाथ शहराला दिले जाते. अंबरनाथ शहराच्या चिखलोली धरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. याठिकाणी प्रचारात पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित होताना दिसून येत नाही.
चौकट

मिरा भाईंदर महापालिकेला स्टेम प्राधिकरणकडून ८६ दक्षलक्षलीटर तर आणि एमआयडीसीकडुन १३५ दश लक्ष लीटर असा एकूण २२१ दक्ष लक्ष लीटर पाणी पुरवठा मंजुर आहे. मात्र प्रत्यक्षात पाणी गळती व इतर कारणांमुळे यात जवळपास दोनशे दक्ष लक्ष लीटर इतकाच पाणी पुरवठाच होतो. मागील वर्षभरापासून दर आठवड्याला दुरुस्तीचे कारण देत २४ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे. परिणामी याचा पाणी वितरणावर मोठा परिणाम होत असून भाईंदरच्या काशिनगर,शीतल नगर, संघवी नगर, हाट केश, गीता नगर, नया नगर, जेसल पार्क, गणेश देवल नगर आणि शांती पार्क परिसरात पाणी टंचाईची तीव्र समस्या उभी राहत आहे. हाच मुद्दा प्रचारात उपस्थित होत आहे.