ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ५६ टक्के पुरुषांनी तर ५७ टक्के महिलांनी मतदान केले असून यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानामध्ये एक टक्क्याने पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात लाडक्या बहिणी मतदानात आघाडीवर असल्याचे चित्र असून महिलांचे वाढलेले मतदान कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, हे आज स्पष्ट होईल.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामधून २४४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान यंत्रामध्ये बंदिस्त झाले आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. काही ठिकाणी मनसे उमेदवार, बंडखोर अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढती झाल्या आहेत. महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना राबविली. या योजनेतील अनुदान आणखी वाढविण्यात येणार असल्याचा प्रचार महायुतीने केला होता. तर, महाविकास आघाडीनेही याच योजनेचा आधार घेत त्यातील अनुदान वाढवून देऊ असा मुद्दा प्रचारात मांडला होता. या योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीने केल्याचे चित्र दिसून आले होते. असे असतानाच, जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे समोर आले आहे.

strong room, Thane , local police, central armed forces,
ठाणे : स्ट्राँग रुम भोवती त्रिस्तरीय सुरक्षेचे कडे, केंद्रीय शसस्त्र दलासह स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results in Marathi
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”
Counting of votes in Panvel under tight police security
कडेकोट बंदोबस्तात पनवेलची मतमोजणी
four constituencies candidates with names similar to the main candidates will contest the assembly elections 2024
ठाणे जिल्ह्यातही नामसाधर्म्याची खेळी; चार मतदारसंघात मुख्य उमेदवारांच्या नावांशी साम्य असलेले उमेदवार रिंगणात
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
In last 20 days 73 611 new voters registered in thane district ahead of assembly elections
जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ, २० दिवसांत ७३ हजार मतदारांची भर

हेही वाचा – कल्याणमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

ठाणे जिल्ह्यात एकूण ७२ लाख २९ हजार ३३९ मतदारांपैकी ४१ लाख १५ हजार ७५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ३८ लाख ४५ हजार ४२ पुरुष मतदारांपैकी २१ लाख ८३ हजार ५११ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ५६ टक्के इतकी आहे. तर, ३३ लाख ८२ हजार ८८२ महिला मतदारांपैकी १९ लाख ३१ हजार ९७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे. १ हजार ४१५ इतर मतदारांपैकी २७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ५६ टक्के पुरुषांनी तर ५७ टक्के महिलांनी मतदान केले असून यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानामध्ये एक टक्क्याने पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

हेही वाचा – ‘समृध्दी’ची शहापूर-आमणे महामार्गावरील कामे शेवटच्या टप्प्यात

पाच मतदारसंघात महिला आघाडीवर

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पश्चिममध्ये पुरुषांचे मतदान ५२ टक्के तर महिलांचे मतदान ५६ टक्के इतके झाले आहे. भिवंडी पूर्वमध्ये पुरुषांचे मतदान ४९ टक्के तर, महिलांचे मतदान ५४ टक्के इतके झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये पुरुषांचे मतदान ५९ टक्के तर महिलांचे मतदान ६० टक्के इतके झाले आहे. ऐरोलीमध्ये पुरुषांचे मतदान ५४ टक्के तर महिलांचे मतदान ५५ टक्के आणि बेलापूरमध्ये पुरुषांचे मतदान ५४ टक्के तर महिलांचे मतदान ५५ टक्के इतके मतदान झाले आहे. यामुळे १८ पैकी ५ मतदार संघात महिलांची मतदान टक्केवारी सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.