ठाणे : आजारी पती आणि मुलावर केलेली काळ्या जादूचा नाश करण्यासाठी मृतदेह आणावा लागेल, अशी बतावणी करत त्यासाठी एका बाबाने ८ लाख ८७ हजार रुपये घेऊन एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी बाबाचा शोध सुरू केला आहे.

भिवंडी येथील मिल्लतनगर भागात फसवणूक झालेली महिला आपल्या कुटुंबासमवेत राहते. तिचा पती आजारी आहेत. त्याचाच फायदा घेवून बाबाने तिचा पती आणि मुलगा यांच्यावर कोणीतरी काळी जादु केली, अशी बतावणी केली. तसेच काळी जादू झाल्याचे भासविण्यासाठी बाबाने तिच्या पती आणि मुलावरून अंडे ओवाळून नेण्यास लावून, मंत्रौच्चार करून अंडयातून लोखंडी खिळा काढून दाखविला. याद्वारे त्याने त्या कुटुंबाला काळया जादुवर विश्वास ठेवण्यास भाग पाडले.

हेही वाचा : कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात

यावर उपाय म्हणून मृतदेह आणून त्याद्वारे काळीजादुचा प्रयोग करून पती आणि मुलावर केलेल्या काळीजादुचा नाश करण्यात येईल असे सांगितले. तसेच मृतदेह आणण्यासाठी महिलेकडून वेळोवेळी ८ लाख ८७ हजार घेवून तिची फसवणुक करून, पैशांचा अपहार केला आहे.

आक्टोंबर २०२३ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी कलम ३१८(४),३१६ (२) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(१), ३(२) नुसार गुन्हा दाखल केला.

Story img Loader