ठाणे : पहाडी पोपटाची विक्री करणाऱ्या एका तस्कराला ठाणे वन विभागाच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून नऊ पोपट जप्त केले असून त्याने हे पोपट कोणाला विक्री केले त्याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे. घोडबंदर येथील एका उपाहारगृहाजवळ पोपट विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : चिनी टोपल्यांचे भारतीय टोपल्यांवर आक्रमण, भारतीय टोपल्यांच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी घट
त्या आधारे पथकाने सापळा रचून तस्कराला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने दहिसरमधील त्याच्या घरात पहाडी पोपट ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घरामध्ये जाऊन नऊ पोपट ताब्यात घेतले. या तस्कराच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी दिली.
First published on: 11-10-2023 at 11:58 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane forest department seized 9 mountain parrots from a smuggler in ghodbunder area css