ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात लढविलेल्या ९ पैकी ९ जागा जिंकत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजप पक्षाचे नेते निवडणुक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागल्याचे चित्र आहे. भाजपकडून जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यानिमित्ताने भाजपकडून जिल्ह्यात येत्या काही महिन्यात होणाऱ्या पालिका निवडणुकींची तयारी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

एकेकाळी शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात भाजपची ताकद वाढली आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीत मिरा-भाईंदर मतदार संघातील जागेवर भाजपचा पराभव झाला होता. येथे भाजपच्या बंडखोर उमेदवार गीता जैन या विजयी झाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपने या जागेवर विजय मिळविला. यामुळे जिल्ह्यात लढलेल्या ९ पैकी ९ जागांवर भाजपने विजय संपादन करत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत एक जागा वाढल्याने भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे. असे असले तरी, ठाण्यातील भाजप पक्षाचे नेते निवडणुक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi
Ex PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

हेही वाचा : ठाणे : वृद्धाची ६८ लाख रुपयांना फसवणूक

राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर भाजपने आता आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्हाअध्यक्षांची एक महत्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात ५० हजार नवीन सदस्य अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यानिमित्ताने भाजपकडून जिल्ह्यात येत्या काही महिन्यात होणाऱ्या पालिका निवडणुकींची तयारी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

ठाणे येथील वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात बुधवारी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नवनिर्वाचित आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक घेतली. पक्ष वाढीसाठी सदस्य नोंदणी महत्वाची असल्यामुळे त्याकडे अधिक लक्ष द्यावे, अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांचा सत्कारही करण्यात आला.

हेही वाचा : कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही

संपुर्ण देशभरात भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुकांमुळे सदस्य नोंदणी अभियान राबविणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे निवडणुका संपताच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक बैठक घेऊन सदस्य नोंदणी अभियान राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी महत्वाची असल्यामुळे तशा सुचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात आमची संख्या जास्त असली तरी मंत्री पद, पालकमंत्री या पद वाटपाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतात आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

Story img Loader