ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या तीन हात नाका सिग्नल परिसरात अंध आणि अपंगाना रस्ता ओलांडता यावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुगम्य सिग्नल यंत्रणा बसविण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये पादचाऱ्यांसाठी सिग्नल सुरू झाल्यास अंध अपंगांना आवाज ऐकू जाणार आहे. त्यामुळे रस्ता ओलांडणे त्यांना सोपे होणार आहे. तसेच सिग्नल परिसरात आणखी काही बदल केले जाणार आहे. येत्या एक ते दोन आठवड्यांत ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात इतर ठिकाणी देखील हा प्रयोग केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका चौक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच चौकातून मुलुंड, वागळे इस्टेट, नौपाडा, हरिनिवास, घोडबंदरच्या दिशेने वाहनांची वाहतुक होत असते. त्यामुळे दिवसाला हजारो हलकी आणि जड वाहने या मार्गावरून वाहतुक करतात. या भागातून पादचाऱ्यांचीही वर्दळ अधिक असते.

हेही वाचा : साक्षरतेने भ्रष्टाचारात वाढ : नेमाडे

त्यामध्ये अंध आणि अपंग व्यक्तिचांही सामावेश असतो. रस्ता ओलांडत असताना या अंध आणि अपंगांना बहुतांशवेळा इतरांचा आधार घ्यावा लागतो. या प्रकारामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून याठिकाणी आता अंध आणि अपंगांसाठी सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे. पादचाऱ्यांसाठी सिग्नल सुरू झाल्यास अपंग किंवा अंध व्यक्तींना रस्ता ओलांडत असताना आवाज ऐकू येणार आहे. त्यासंदर्भात यंत्रणा बसविण्याचे कार्य सर्व सिग्नलवर सुरू आहे. या कामास वाहतुक शाखेने परवानगी दिली आहे. तसेच अपंग व्यक्ती आणि पायांच्या स्नायूचे किंवा पायांचे इतर आजार असलेल्या व्यक्तींना रस्ता ओलांडता यावा यासाठी चढ-उतार असलेला भागही केला जाणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही अशाचप्रकारे सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Vinod Kambli Heath: “कल खेल में, हम हो ना हो…”, विनोद कांबळींची रुग्णालयातून भावनिक प्रतिक्रिया, प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून दिला चाहत्यांना संदेश!

तीन हात नाका सिग्नल परिसर हा ठाण्यातील सर्वाधिक रहदारीचा चौक आहे. या भागात महापालिकेच्या माध्यमातून अंध अपंगासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. या कामास ठाणे वाहतुक शाखेने परवानगी दिली असून त्याचे कामही सुरू झाले आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यास अंध-अपंगांना सिग्नल ओलांडताना येणाऱ्या अडचणींपासून सुटका होण्याची शक्यता आहे.

– पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक पोलीस.