ठाणे : गेल्याकाही महिन्यांपासून मारहाण आणि हत्या अशा गुन्ह्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईतून उघडकीस आले. यावरून कासारवडवली पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, याप्रकरणी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी चौकशीचे दिल्याचे सुत्रांनी सांगितले. यामुळे कासारवडवली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे ठाणे पोलीस डोळ्यात तेल घालून काम करत होते. परंतु नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला घोडबंदर येथील कासारवडवली भागात खाडी किनारी निर्जनस्थळी रेव्ह पार्टीचे आयोजन झाले. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने याप्रकरणात कारवाई करून ९५ तरूणांना ताब्यात घेतले. तसेच दोन जणांना अटक केली. रेव्ह पार्टीच्या आयोजनाचे वृत्त समोर येताच संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. रेव्ह पार्टी आयोजनाची तयारी सुरू असतानाही कासारवडवली पोलिसांना याबद्दलची माहिती कशी मिळाली नाही असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. त्यामुळे कासारवडली पोलीस ठाण्याच्या कारभारावरही प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा : “जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू”, आनंद परांजपे यांचा इशारा

सुमारे महिन्याभरापूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने त्याच्या मैत्रिणीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांच्या तपासाविषयी पिडीत तरूणीने नाराजी व्यक्त केली. घोडबंदर येथील तिहेरी हत्याकांड घडले होते. यातील आरोपीला गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यामुळे वारंवार कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते. रेव्ह पार्टी प्रकरणात उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी चौकशी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे आता कासारवडवली पोलीस ठाण्यातील कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane investigation of kasarvadavali police station in rave party case css
Show comments