ठाणे: मध्य रेल्वेने ठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकातील फलाटाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला होता. हा मेगा ब्लॉक रविवारी दुपारी संपुष्टात आला. त्यामुळे सोमवारी रेल्वेचे वाहतूक सुरळीत होईल असा अंदाज प्रवाशांना होता. परंतु सोमवारी सकाळी रेल्वे गाड्यांची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होती. नव्याने बसवण्यात आलेल्या यंत्रणांच्या तांत्रिक कारणांमुळे उशिराने रेल्वे वाहतूक सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिले जात आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल झाल्याने अनेकांना कामावर वेळेच्या ठिकाणी पोहोचता आले नाही.
हेही वाचा : घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी कायम; बंदी असतानाही अवजड वाहनांच्या घुसखोरीने एक किलोमीटरसाठी दोन तास
मध्य रेल्वेने ठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकातील फलाटाच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला होता. ही दोन्ही कामे रविवारी संपुष्टात आली. त्यामुळे सोमवारपासून प्रवाशांना सुरळीत प्रवास होईल असे वाटत होते. परंतु सोमवारी सकाळपासूनच रेल्वे गाड्यांची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. काल बसवण्यात आलेल्या यंत्रणांमधील तांत्रिक कारणांसाठी ही लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्याचे माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. असे असले तरी प्रवाशांना केवळ रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती स्थानकात दिली जात आहे. परंतु त्याचे ठोस कारण दिले जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना त्यांच्या ठराविक वेळेतील गाड्या मिळाल्या नाही. त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. समाज माध्यमांवर देखील प्रवाशांकडून रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याबाबतचा जाब विचारला जात आहे. परंतु त्यांना पुरेशी माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही.