ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदार संघासाठी एकूण ३५५ अर्जाचे वितरण करण्यात आले होते. यापैकी नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रियेत २० अर्ज अवैध ठरल्याने ९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी १२ जणांनी नामनिर्देशन अर्ज माघार घेतल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात ८४ उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिलपासून नामनिर्देश अर्ज दाखल व वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे अंतिम तारीख होती. या कालावधीत जिल्ह्यात ३५५ नामनिर्देशन अर्ज वितरीत करण्यात आले. त्यापैकी १११ उमेदवारांनी १३६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. यामध्ये काही उमेदवारांकडून दोन तर, काही उमेदवारांनी चारचार अर्ज दाखल केले. शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत २० अर्ज अवैध तर, ९१ अर्ज वैध ठरले होते.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
pm narendra modi rally
नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Ranthambore National Park 25 tigers missing
७५ पैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता…रणथंबोरच्या जंगलात जे घडतेय…
maharashtra vidhan sabha election 2024 Old faces in 18 assembly constituencies in Thane district
ठाणे जिल्ह्याच्या निवडणुक रिंगणात जुनेच चेहरे

हेही वाचा : भिवंडीतून निलेश सांबरे यांचा अर्ज बाद , तरीही महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम कशामुळे?…

यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघात ठाणे लोकसभेसाठी अर्ज छाननी प्रक्रियेत ३६ पैकी सर्वाधिक ११ अर्ज अवैध ठरल्याने २५ अर्ज वैध ठरले आहे. त्यात सोमवारी अर्ज माघारीच्या एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात २४ उमेदवार उभे ठाकले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत ३४ पैकी ४ अर्ज अवैध ठरल्याने ३० अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यामुळे २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भिवंडी लोकसभा मतदार संघात अर्ज छाननी प्रक्रियेत ४१ पैकी ५ अर्ज अवैध ठरल्याने ३६ अर्ज वैध ठरले होते. त्यात सोमवारी अर्ज माघारीच्या ९ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यामुळे ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.