ठाणे : गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, मखर, विद्युत रोषणाई, हाताने बनविलेल्या फुलांच्या टोपल्या यांसह विविध खाद्य पदार्थांची यंदा महिला बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांकडूनही घरगुती वस्तूंनाच प्राधान्य दिले गेले असल्याने बचत गटांना यंदाचा गणेशोत्सव आर्थिक दृष्ट्या फलदायी ठरला असून जिल्ह्यातील महिला बचत गटांची सुमारे या वस्तू विक्रीतून १५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत गट कार्यरत आहेत. जिल्ह्यातील बचत गटांची संख्या सुमारे दहा हजार इतकी असून यामध्ये एक लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यातील या बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग, मध्यमउद्योग सुरू करण्यात आले आहेत. यातून बचत गटातील महिलांनाही एक सक्षम रोजगार उपलब्ध झाला आहे. तर या महिलांनी मिळून सुरू केलेल्या लघु आणि मध्यम उद्योगातून त्यांच्या आसपासच्या परिसरातील महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी या उत्सवांच्या काळात या बचत गटांनी बनवलेल्या विविध वस्तूंना तसेच खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. गतवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात देखील या बचत गटांनी तयार केलेल्या विविध शोभेच्या वस्तूंना आणि खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. उपहारगृहांमध्ये भेसळयुक्त मिठाईची भीती, मिठाईचे वाढलेले दर, तसेच फराळाच्या वाढलेल्या किंमती यामुळे यंदा अनेक भाविकांनी आणि मंडळांनी घरगुती पद्धतीने बनविलेल्या फराळ आणि मिठाईला पसंती दिली आहे. यामध्ये बचत गटाने तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा अधिकतर समावेश आहे. त्याचबरोबर बांबूसह इतर पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करून तयार करण्यात आलेल्या शोभेच्या वस्तूंची ही यंदा बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे. यामुळे महिलांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. तसेच गणेशोत्सव सुरू होऊन अद्याप दोनच दिवस झाले आहेत. या कालावधीत महिला बचत गटांकडून वस्तू आणि खाद्य पदार्थांच्या विक्रीतून तब्बल १५ लाख रुपयांहून अधिकची आर्थिक उलाढाल करण्यात आली आहे. तर या महिलांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थाना अद्यापही मागणी सुरूच असल्याची माहिती अंबरनाथ तसेच कल्याण येथील बचत गटांच्या महिलांनी सांगितले. यामध्ये विधवा आणि निराधार बचत गटांच्या देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सर्व बचत गटांकडून मखर, कागदी फुलांच्या माळा, फुलांच्या टोपल्या, दिव्याचा वाती, तेल, अगरबत्ती, धूप, तूप यांसह विविध खाद्यपदार्थ यांची विक्री केली जात आहे.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

हेही वाचा : ठाणे: विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल

खेळते भांडवल मोलाचे

राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांना जिल्हा परिषदेच्या वतीने खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. बचत गटांना झालेल्या या पतपुरवठ्यामुळे सर्व महिलांना त्यांचे लघु आणि मध्यम उद्योग अधिक सक्षम करण्यास मोठा हातभार लागला. त्यामुळे आज शेकडो बचत गट विविध उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली आहे.

हेही वाचा : गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा लाटला; शिधा विकण्यासाठी नेत असताना जप्त, दोघांवर गुन्हा

गणपती स्थापनेच्या दिवशी अनेक मंडळ आणि नागरिकांच्या दिवशी घरी पूजेचे आयोजन करण्यात येते. यावेळी आमच्याकडुन मोठ्या प्रमाणात मोदक, लाडू, खापरा वरच्या पुरणपोळ्या, उकडीचे मोदक यांची उत्तम विक्री झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने लाभदायी ठरला आहे.

मयुरी अमृतकर, स्नेहबंध महिला बचत गट, अंबरनाथ