ठाणे : उसने १०० रुपये दिले नाही म्हणून एका तरूणावर चाकूने वार करण्यात आल्याचा प्रकार डायघर भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डायघर येथील दहिसर भागात जखमी तरूण त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. त्याची या भागात पान टपरी आहे. याच परिसरात राहणारा मयुर पाटील त्याठिकाणी आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : विठ्ठलवाडी- कल्याण नगर उन्नत मार्गाला मंजुरी, एमएमआरडीएकडून ६४२.९८ कोटींची प्रशासकीय मान्यता

त्याने तरुणाकडून १०० रुपये उसने मागितले. यापूर्वीही तरूणाने मयुरला उसने पैसे दिले होते. त्यामुळे मयुरला त्याने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मयुरने त्याच्याकडील चाकूने तरूणावर वार केले. या हल्ल्यात तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.