ठाणे : राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांना ठाण्यात मराठा समाजाच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखविले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ठाण्यात सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तटकरे पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात येत असताना अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते त्याठिकाणी आले. त्यांनी तटकरे यांना काळे झेंडे दाखविले तसेच घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : डोंबिवली: भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यामुळे रस्ते झाले फेरीवालामुक्त

दरम्यान, मराठा समाजाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते सुनिल तटकरे यांची भेट घेतली आहे. आरक्षण कधी मिळणार अशी विचारणा मराठा नेत्यांनी तटकरे यांच्याकडे केली. ‘आरक्षण द्या, अन्यथा पुलाखाली फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही’, असा इशारा देखील मराठा समाजाच्या आंदोलकांनी तटकरे यांना दिला.

Story img Loader