ठाणे : प्रेयसीला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नसून त्याचबरोबर या गुन्ह्यात भादवी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे ) चा समावेश नसल्यामुळे पोलिसांवर चौफेर टिका होऊ लागली आहे. या टिकेनंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून त्यामार्फत तपास सुरू केला आहे. याप्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून आयोगाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे पहा >> Photos : अश्वजीत गायकवाडची प्रेयसी आहे इन्स्टाग्राम एन्फ्लुएंसर

घोडबंदर येथील वाघबीळ भागात २६ वर्षीय पिडीत तरुणीने राहते. अश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा पीडितेने केला आहे. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अश्वजीत याने घोडबंदर येथील एका हाॅटेलजवळ भेटण्यास बोलावले. तिथे झालेल्या वादानंतर त्याने मारहाण करत कारने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितेने केला होता. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात दुखापत करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, इतरांचे जिवीतास किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोचवणे, धमकाविणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

तसेच या प्रकरणात ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित तरुणीने केली असून पीडित तरुणीच्या वकील दर्शना पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अशीच मागणी करत याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी अद्याप ही मागणी मान्य केलेली नाही. या प्रकरणात एक बडा उद्योगपती हस्तक्षेप करीत असून याप्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा शहरात आहे. या प्रकरणामुळे ठाणे पोलिस टिकेचे धनी ठरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे.

“कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एक महिला तक्रारदार असून त्यात आरोपींमध्ये अश्वजित अनिल गायकवाड आणि इतरांचे नाव आहे. याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. हे पथक सर्व बाजूने याप्रकरणाचा तपास करीत आहेत. साक्षीदारांचे जबाब नोंदविले जात आहेत. फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान आणखी तथ्ये उघड झाल्यास कायद्याच्या पुढील कलमांचा समावेश केला जाईल”, असे ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : कल्याणातील आयमेथॉन स्पर्धेत पाच हजार धावपटूंचा सहभाग, सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी राबवण्यात आला उपक्रम

ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली आहे.