ठाणे : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात असलेले भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून ” आवडत असेल किंवा नसेल मात्र महायुतीचा धर्म पाळून सर्वानी सुलभा गायकवाड यांचा प्रचार करा. आपल्यावर कोणीही शंका घेणार नाही असा प्रचार करून आपल्याला कल्याण पूर्वची महायुतीची जागा निवडून आणायची आहे ” असे आवाहन यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना केले. यामुळे गेले अनेक महिने गणपत गायकवाड यांचा कडाडून विरोध करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संबंध हे कायमच परस्परविरोधी राहिले आहेत. अनेकदा भर सभेत अथवा विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमातून त्यांनी एकमेकांवर उघडपणे टीका देखील केली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि खासदार डॉ. शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात गोळीबार केला होता. याच गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात आहेत. यानंतर शिवसेनेतील सर्वच नेत्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून या घटनेचा निषेध करत गणपत गायकवाड यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली होती. तर विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड अथवा त्यांच्या पत्नी आणि कल्याण पूर्व च्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांचे प्रचाराचे काम करणार नाही अशी भूमिका देखील स्थानिक शिवसैनिकांनी घेतली होती. तर या गोळीबार प्रकरणातील पदाधिकारी महेश गायकवाड यांनी शिवसेना(एकनाथ शिंदे) पक्षातून बंडखोरी करत सुलभा गायकवाड यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. असे असतानाच आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहून शिवसैनिकांना सुलभा गायकवाड यांच्यासाठीच काम करण्याचे आदेश दिल्याने सर्वांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नेमकं काय म्हणाले खासदार डॉ.शिंदे…

पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश असतो. आपल्याला सर्वांना ही महायुतीची जागा निवडून आणायची आहे. यासाठी सर्वांनी खासकरून शिवसैनिकांनी काम करा. मागील काही दिवसात जे झालं ते सर्व बाजूला ठेवा. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तुम्हाला पक्षाचा आदेश आहे महायुतीच्या उमेदवारास विजयी करायचे आहे. आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून सुलभा गायकवाड यांना प्रचंड मतांनी विजयी करा. याविषयी कोणालाही शंका येता कामा नये, असे सर्वांनी काम करा. असे वक्तव्य खासदार डॉ.शिंदे यांनी या मेळाव्यात केले.

Story img Loader