ठाणे : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात असलेले भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून ” आवडत असेल किंवा नसेल मात्र महायुतीचा धर्म पाळून सर्वानी सुलभा गायकवाड यांचा प्रचार करा. आपल्यावर कोणीही शंका घेणार नाही असा प्रचार करून आपल्याला कल्याण पूर्वची महायुतीची जागा निवडून आणायची आहे ” असे आवाहन यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना केले. यामुळे गेले अनेक महिने गणपत गायकवाड यांचा कडाडून विरोध करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा