ठाणे : नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसेच अमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. वाहतुक पोलिसांचे पथक शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यांलगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहेत. तर अमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा, स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नववर्षस्वागताच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्ट्या निमित्ताने बाहेर पडत असतात. या दरम्यान, काही वाहन चालक मद्य पिऊन वाहने चालवित असतात. तसेच दुचाकीवरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असतात. याप्रकारामुळे अपघाताची भिती व्यक्त होत असते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे वाहतुक पोलीस सज्ज झाले असून येत्या दोन दिवसांत पोलिसांची विविध पथके शहरातील चौका-चौकांत तैनात केली जाणार आहे. ठाणे वाहतुक पोलिसांकडे २५ श्वास विश्लेषक यंत्रे (ब्रेथ अनालायझर) आहेत. या यंत्रांद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या चालकांवरही मोटार वाहन कायद्यातील तरतूदी नुसार कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा : कल्याण लोकसभेची आता चिंता नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

शहरातील पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा छुप्या पद्धतीने सेवन केले जात असते. त्यामुळे अशा पार्ट्यावर अमली पदार्थांचे तस्कर देखील येत असतात. या तस्करांवर अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे अन्वेषण शाखेची पथके लक्ष ठेऊन आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू झाली आहे. तसेच शाळा, महाविद्यालय तसेच निर्जन स्थळी पोलिसांचे गस्ती पथक तैनात असणार आहे असे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाणे : तरुणीची ३१ व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या

“ठाणे आयुक्तालय क्षेत्रात वाहतुक पोलिसांची पथके महत्त्वाच्या चौकांमध्ये तैनात असतील. मद्यपी वाहन चालकांविरोधात पथकांकडून कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.” – डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे शहर वाहतुक शाखा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane on the eve of new year police prepared to take action against drug smugglers css
Show comments