ठाणे : जादा परताव्याच्या अमीषाने एकाची ६ कोटी २५ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.
फसवणूक झालेले व्यक्ती ठाण्यात वास्तव्यास आहेत. २०२० मध्ये त्यांची ओळख दोन भामट्यांसोबत झाली होती. आपली कंपनी गुंतवणूकीवर सात ते आठ टक्के दरमहा परतावा देते. तसेच या कंपनीकडे केंद्र शासनाचा परवाना असल्याची बतावणी भामट्याने केली. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीने नातेवाईक तसेच मित्र-मैत्रिणींकडून गुंतवणूकीसाठी पैसे घेतले. सुरुवातीच्या कालावधीत त्यांना परतावा मिळू लागला होता.
परताव्यातील चार टक्के रक्कम फसवणूक झालेले व्यक्ती त्यांच्या गुंतवणूकदारांना देत होते. परतावा मिळत असल्याने फसवणूक झालेल्या व्यक्तीने संबंधित कंपनीत टप्प्याटप्प्याने ६ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मागील दीड वर्षांपासून त्यांना कोणताही परतावा प्राप्त झाला नव्हता. अखेर तक्रारदार यांनी याप्रकरणी ठाणे पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. या तक्रारीच्या आधारे, मनिष मलकान आणि अर्पित शहा या दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.