ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात एका ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने नाशिकमधील एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. यश गायकवाड (१६) असे मृताचे नाव आहे, तर प्रमोद सेजवड (३७) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठाण्यासाठी गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट?

नाशिक येथे राहणारे प्रमोद सेजवड आणि यश हे दोघे मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून घोडबंदरच्या दिशेने वाहतूककरत होते. ते आनंदनगर सिग्नल परिसरात आले असता, मागून भरधाव येणाऱ्या ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या यश गायकवाड यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, प्रमोद सेजवड गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. प्रमोद सेजवड यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane person from nashik died in accident at ghodbunder road css