ठाणे : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई या भागातील देहविक्री करणाऱ्या १३२ महिलांना एका सामाजिक संस्थेने उद्योजकतेचे धडे देऊन उद्योजक बनविले आहे. यामुळे गेेले अनेक वर्ष देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात या संस्थेमुळे परिवर्तन झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक वर्षापासून देहविक्री करणाऱ्या महिलांना यातून बाहेर पडण्यासाठी राज्य शासन वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे. याच संकल्पनेअंतर्गत ठाण्यातील क्षमता संस्थेच्या ‘उत्कर्ष मायक्रो बिजनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग’ या उपक्रमा अंतर्गत देहविक्रेय करणाऱ्या महिलांना उपजीविकेचे साधन मिळावे यादृष्टीने प्रयत्न केला जात आहे. मागील वर्षापासून सवेरा, ओएसीस, सॅल्वेशन आर्मी संस्था आणि क्षमता संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने लघू व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन देहविक्रेय महिलांना लघुउद्योजक बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा : ठाण्यात परवडणाऱ्या घरांसाठी ठेकेदार मिळेना, पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या उभारणीसाठी पुन्हा निविदा; अटी व शर्तींमध्ये बदल

मुंबईतील कामाठीपुरा, भांडूप (सोनापूर), तुर्भे, भिवंडी या परिसरात या संस्था कार्यरत आहेत. भिवंडीमध्ये क्षमता संस्थेचे केंद्र असून इतर केंद्रांत उर्वरित संस्थांच्या सहयोगाने काम सुरू आहे. २०२२ पासून आतापर्यंत एकूण १३२ महिला यशस्वीपणे लघुउद्योगाकडे वळल्या आहेत, केवळ व्यवसाय नव्हे तर सन्मानाने जगण्यासाठी बळ मिळालेल्या या महिला इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. या उपक्रमाअंतर्गत महिलांना चार महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

आम्हाला आधार मिळाला

आमच्यासाठी ही मोठी संधी आहे, या उद्योगातून मोठे व्हायचे आहे. तसेच आम्हाला हा जो आधार मिळतोय त्यासाठी क्षमता संस्थेचे आभारी आहोत असे मत देहविक्री व्यवसायातून बाहेर येत उद्योग चालविणाऱ्या महिलेने व्यक्त केेले.

हेही वाचा : डोंबिवलीतील बेकायदा राधाईच्या जमीन मालकांच्या जिवाला गुंडांपासून धोका, ठाणे पोलीस आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी

क्षमताअंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणाचे काम सातत्याने सुरू असून आतापर्यंत विविध भागातील १३२ महिलांचे लघुउद्योग सुरू करून देण्यात आले आहेत, महिला यशस्वीरित्या त्यांच्या नवीन जीवनाच्या वाटेवर वाटचाल करत आहेत आणि हा आकडा आणखी वाढणार असा विश्वास आहे.

भारती ताहिलियानी, संस्थापिका, क्षमता संस्था
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane prostitute woman turning towards entrepreneurship with help of social organizations css