ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात आता उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. या प्रचारासाठी राजकीय पक्ष, अपक्ष आणि विविध संघटनांकडून रथांचा वापर केला जात असतो. या वाहनांची जाहीरात परवानगी अंतर्गत प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी केली जाते. त्यानुसार, ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये तब्बल ९४ रथांना जाहीरात नोंदणी मिळाली आहे. या रथांमुळे प्रादेशिक परिवहन विभागाला देखील महसूल मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण

विधानसभा निवडणूक प्रचाराला अवघे दोन आठवडे शिल्लक आहे. त्यामुळे विधानसभेचे उमेदवार आता प्रचारासाठी गल्लीबोळात देखील फिरताना दिसत आहे. प्रचारामध्ये जनतेपर्यंत पोहचण्यासाठी विविध वाहनांचा वापर होत असतो. या वाहनांवर राजकीय पक्ष किंवा अपक्षांचे निवडणूक चिन्ह असते. या वाहनांमध्ये फिरून उमेदवार आणि राजकीय नेते प्रचार करत असतात. अशा वाहनांची जाहीरात परवानगी अंतर्गत प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात नोंदणी केली जात असते. प्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे उपविभागात म्हणजेच, ठाणे, भिवंडी आणि मिरा भाईंदर या शहरात अशा ९४ रथांची नोंदणी करण्यात आली आहे. राजकीय पक्ष, अपक्षांकडून या रथांचा वापर केला जात असतो. या परवान्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाला दीड लाखाहून अधिकचा महसूल मिळाला आहे. या नोंदणीत वाढ होऊ शकते अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane rto give permission to 94 chariots for election campaign css