ठाणे: ‘पक्ष कुणी चोरला?’ असा सवाल फलकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठाणेकरांना केला आहे. दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का? यासंदर्भात ठाणेकरांना व्हाट्सअप क्रमांकावर प्रतिक्रिया कळवण्याचे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी नागरिकांना केले आहे. लोक न्यायालयात मत जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राज्याचे राजकारण ‘हिंदुत्व’ या एका शब्दाभोवती फिरत आहे. ‘हिंदुत्वा’ साठी शिवसेना पक्षात फूट पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. राज्यात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन पक्ष आहेत. या फुटीचे केंद्रबिंदू म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. याच, ठाणे शहरात ठाकरे गटाकडून नागरिकांना ‘पक्ष कुणी चोरला?’ असा सवाल केला जात आहे. ठाणे शहरातील मुख्य रस्त्यावर ‘पक्ष कुणी चोरला?’आणि ‘काय आहे हिंदुत्व ?’ असे प्रश्न फलकबाजीच्या माध्यमातून विचारले जात आहेत. ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी हे फलक लावले आहेत. या फलकावर ‘पक्ष कुणी चोरला?’ दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, ‘काय आहे हिंदुत्व ?’ अशा स्वरुपाचा मथळा आहे. त्यासह, त्यावर व्हॉटसअप क्रमांक असून नागरिकांना आपली मते त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून एक प्रकारची मोहीम सुरु असून लोकांच्या न्यायालयात न्याय मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : मुंबई नाशिक महामार्गावरील कामामध्ये अडथळा आणल्यास फौजदारी कारवाई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या मोहिमेच्या माध्यमातून हिंदुत्वाची नक्की व्याख्या काय आहे, एखाद्याची गोष्ट चोरणे म्हणजे हिंदुत्व का? आपल्या हिंदुत्वामध्ये असे संस्कार नाही आणि संस्कृती देखील नाही. त्यामुळे हिंदुत्वाच्या बाबतीत लोकांचे काय मत आहे, ते जाणून घेत आहोत.

केदार दिघे, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane shivsena uddhav thackeray s leader kedar dighe what is hindutva campaign css