ठाणे : शाळेचे मासिक शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागात असलेल्या लिटील फ्लाॅवर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी घडला. या प्रकरणावरुन पालकांनी शाळेसमोर गोंधळ घातला होता. काही पालकांनी ऑनलाईन शुल्क भरल्याचे सांगितले. परंतु, शाळेकडे त्याचा पुरावा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेवरून उठवल्याचा आरोप त्यांनी केला. याची माहिती मिळताच काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आले होते.

वर्तकनगर भागात लिटील फ्लॅावर इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या चाचणी परिक्षा सुरु आहेत. शाळेचे मासिक शुल्क भरले नाही म्हणून ३०० ते ३५० विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू दिले नाही. त्यांना एक तास वर्गाबाहेर उभे केले. यातील काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शुल्क भरले होते. त्यांनी हे शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू, मासिक शुल्क भरल्याचा शाळेला कोणताही पुरावा मिळालेला नाही, त्यामुळे तुम्हाला परिक्षा देता येणार नाही असे, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी घरी येऊन हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ शाळेत धाव घेत गोंधळ घातला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : ठाकरे गटात पुन्हा मोठी फुट पडणार? शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे चर्चेला सुरूवात

आम्ही ॲानलाईन शुल्क भरले आहे, आमच्याकडे याचा पुरावाही आहे. तो पुरावा आम्ही शाळेच्या कार्यालयात दाखविला नाही, म्हणून शाळेकडे त्याचे अपडेट नाही, अशी प्रतिक्रिया इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी दिली. तर, या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी शाळेत आले होते. यादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस याठिकाणी हजर होते. यावेळी ठाणे महापालिका शिक्षण विभागाचे काही अधिकारी देखील उपस्थित होते. यांसदर्भात, शाळेच्या मुख्यध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता, तो होऊ शकला नाही. शाळेतील विद्यार्थी कपाळावर गंध लावून आल्यास त्यांच्याकडून शिक्षेच्या स्वरुपात दंड आकारण्यात येतो. तसेच शाळेत मराठी बोलले तरी दंड आकारण्यात येत असल्याचा आरोप काही पालकांकडून यावेळी करण्यात आला.

हेही वाचा : “आदित्य ठाकरे दावोसला बर्फात कुणाबरोबर खेळत होते”, नरेश म्हस्के यांचा सवाल

“विद्यार्थ्यांनी मासिक शुल्क भरले नाही म्हणून त्यांना परिक्षेला बसण्यास मनाई करणे, हे चुकीचे आहे. या घडलेल्या प्रकरणाबाबत आम्ही शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी लवकरात लवकर शाळेवर कारवाई केली जाईल.” – बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी, ठाणे महापालिका.

हेही वाचा : कल्याण जवळील अटाळी गावात बैलांच्या झुंजीत दोन्ही बैल जखमी, बैल मालकांवर गुन्हा दाखल

“मी माझ्या मुलीचे मासिक शुल्क ऑनलाईन स्वरुपात भरले होते. परंतु, तरीही शिक्षकांनी तिला परिक्षेला बसू दिले नाही. कारण, त्यावेळी शुल्क भरल्याचा पुरावा तिच्याकडे नव्हता. मासिक शुल्काबाबत शाळा प्रशासनाने परीक्षेच्या दहा ते पंधरा दिवस आधी पालकांची बैठक घेऊन त्या बैठकीत पालकांना शुल्क भरण्याचे आवाहन केले पाहिजे होते. परंतू, शाळेने असे केले नाही. थेट परिक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना परिक्षेवरुन उठवले. याचा विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला आहे.” – नेत्रा गाडे, पालक

Story img Loader