बदलापूर : आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील वाढती पर्यटक संख्या कौतुकास्पद असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात मात्र प्रमुख निसर्ग पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे धरणे, नदी, धबधबे आणि तलावांच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. शिवाय, पावसाळी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना मिळणारा हंगामी रोजगारावरही पाणी सोडावे लागण्याची स्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक नागरीकरण झाले आहे. शिवाय ठाण्याची निसर्गसंपन्न जिल्हा अशीही ओळख आहे. अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि ठाणे तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी खाडी किनारा, धबधबे, तलाव आणि धरणांवर झुंबड उडते. मुंबई, उपनगर आणि रायगड आणि पुणे जिल्ह्यातून पर्यटक पर्यटनस्थळांवर दाखल होतात.

हेही वाचा : ठाणे: अनैतिक संबंधातून तरुणीची हत्या

गेल्या काही वर्षांत विविध ठिकाणी निसर्ग पर्यटन केंद्र, खासगी पर्यटन केंद्रांचाही विकास करण्यात आला आहे. निसर्ग पर्यटन स्थळांवरील स्थानिकांना रोजगारही मिळतो. पर्यटकांची खाद्यापदार्थ, आणि निवासाची सोय या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळतो. आदिवासी रानभाज्या आणि फळांची विक्री करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात येत आहे.

यावर्षीही ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानंतर जवळपास प्रमुख निसर्ग पर्यटन केंद्रांवर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. पर्यटनस्थळी सरसकट बंदी न घालता व्यवस्थापन केल्यास पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेता येईल. अपघात होतील अशा ठिकाणी पर्यटकांना जाण्यास अटकाव वा धोक्याच्या ठिकाणी जाऊ देण्याबाबत व्यवस्थापन केल्यास पर्यटनाला बळ मिळेल, असा एक मतप्रवाह गेले काही वर्षे तयार झाला असून त्यावर सरकारने विचार करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : भाजपच्या ठाण्यात केळकरांची कोंडी?

निर्बंध काय?

● पावसामुळे वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात पोहणे, धबधब्याच्या प्रवाहाखाली जाणे, धबधब्याच्या परिसरात मद्या बाळगणे, प्राशन करणे, विक्री करणे यावर बंदी

● धोकादायक वळणे, कठडे, धबधबे अशा ठिकाणी चित्रीकरण करणे, सेल्फी काढण्यावर हीमनाई.

● अशा ठिकाणी सायंकाळी सहा ते सकाळी सहादरम्यान जाणे, प्रदूषण करणे, या स्थळांपासून एका किलोमीटरपर्यंत वाहने नेण्यास सक्त मनाई

मनाई आदेश असलेली स्थळे

कल्याण

कांबा, पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट, चौपाटी.

अंबरनाथ

कोंडेश्वर, आंबेशिव नदी, चांदप, आस्नोली, बारवी नदी, चंदेरी गड, धामणवाडी, तारवाडी, भोज, दहीवली, मळोचीवाडी.

हेही वाचा : ठाण्यातील श्वानावरील अत्याचारप्रकरणी अखेर गुन्हा दाखल;जुन्या कलमानुसार ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला

मुरबाड

सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्र गड, बारवी धरण परिसर, माळशेज घाट, माळशेजचे सर्व धबधबे, पडाळे धरण परिसर, माळशेज घाटातील सर्व धबधबे, गोरखगड, नानेघाट.

शहापूर

भातसा धरण व परिसर, माहुली गड व पायथा, अशोका धबधबा, खरोड, आजा पर्वत डोळखांब, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे.

भिवंडी

गणेशपुरी नदी परिसर वज्रेश्वरी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane tourism at famous places prohibited as economy based on tourism affected css